शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेची सोनसाखळी हिसकावली

धुळ्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. सीसीटीव्हीत दोघे संशयित कैद झाले.

धुळ्यात मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेची सोनसाखळी हिसकावली

धुळ्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी भरदिवसा हिसकावून नेली. मिल परिसरातील शासकीय दूध डेअरीजवळ असलेल्या नवनाथ मंदिराजवळ गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांमध्ये आणि महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी सातच्या सुमारास घटना

थंडीचे दिवस सुरू झाल्याने आरोग्याची काळजी म्हणून पहाटेच्या गुलाबी थंडीत आणि शुद्ध हवेत फिरण्यासाठी धुळेकर मोठ्या संख्येने बाहेर पडतात. यात पुरुषांसह महिला व तरुणींची संख्याही मोठी असते. हीच संधी साधून चैन स्नॅचर्स सक्रिय झाले आहेत. मिल परिसरातील नवनाथ मंदिराजवळ राहणारी एक महिला गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती. ती नवनाथ मंदिराजवळून जात असताना मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली.

सीसीटीव्हीत संशयित कैद

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेने आरडाओरड केली; परंतु त्याआधीच चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अर्चना पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धोंगडे, पोलिस कर्मचारी महेश मोरे, संजय सूर्यवंशी यांच्यासह डीबी पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका कॅमेऱ्यात दुचाकीवरील दोन्ही संशयित चोरटे कैद झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांनीही चेहऱ्याला रुमाल बांधल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला असून शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance