शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोसंबींच्या मैफलीने रंगली दिपालीनगरातील पाडवा पूर्वसंध्या

दिपालीनगर येथील छाजेड उद्यानात दिवाळीनिमित्त आयोजित सांज मैफलीत अभिजीत कोसंबी यांनी गीते सादर केली. शेकडो श्रोत्यांनी पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला.

कोसंबींच्या मैफलीने रंगली दिपालीनगरातील पाडवा पूर्वसंध्या

पार्श्वगायक अभिजीत कोसंबी यांनी सादर केलेल्या एक से एक गीतांनी आणि समोर बसलेल्या शेकडो रसिकांच्या टाळ्या व वन्स मोअरच्या दिलखुलास दादेने दिपालीनगर येथील छाजेड उद्यानात पाडवा पूर्वसंध्या रंगली. विनय नगर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था आणि प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका रूपाली निकुळे व माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिपावली सांज मैफलीत आणि दीपोत्सवात हा सोहळा अनुभवास मिळाला.

गाण्यांना मिळाली दिलखुलास दाद

महेश धोडपकर प्रस्तुत या मैफलीत अभिजीत कोसंबी यांनी ‘मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया’, ‘माऊली माऊली’, ‘राधा ही बावरी’ अशी गीते सादर केली. त्यांना अपर्णा माडीवाले आणि मीनल थोडपकर यांनी ‘माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली’, ‘चला जेजुरीला जाऊ’ आदी गीतांसह ‘हाई झुमकावाली पोरं’ हे अहिराणी गीत सादर करून खंबीर साथ दिली. सचिन जाधव यांच्या बहारदार निवेदनाने मैफलीत रंग भरले, तर अनिल धुमाळ, देवानंद पाटील आणि प्रतीक पाटील यांनी साथसंगत दिली.

शेकडो पणत्यांचा दीपोत्सव

येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात आणि उद्यान परिसरात उपस्थित श्रोत्यांनी सोबत आणलेल्या शेकडो पणत्या एकाच वेळी प्रज्वलित केल्याने या दीपोत्सवात संपूर्ण उद्यान लख्ख झाले होते.

या वेळी आमदार देवयानी फरांदे, ज्येष्ठ नेते प्रा. सुहास फरांदे, प्रा. सुनील फरांदे, भाजप गटनेता ॲड. श्याम बडोदे, पूर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, संध्या कुलकर्णी, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. अजिंक्य साने, प्रकाश नन्नावरे, मनिषा खोडे, सचिन कुलकर्णी, सुनील खोडे आदी उपस्थित होते.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance