मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे सध्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटात आदिनाथ भरतची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा भाग होणे आदिनाथसाठी अत्यंत खास अनुभव ठरला आहे.
आदिनाथने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून त्यात या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. आदिनाथचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ शेअर करत आदिनाथने आपल्या प्रवासाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.
भूमिकेत शिरण्याचा प्रवास अधिक रोमांचक
आदिनाथने सांगितले की, एखाद्या भूमिकेत शिरणे आणि तिची गोष्ट समजून घेणे, हा प्रवास अंतिम परिणामापेक्षा अधिक रोमांचक असतो. या प्रक्रियेतले पडद्यामागचे क्षण कलाकारांसाठी अत्यंत खास असतात. उत्सुकता, समाधान, असमाधान, काहीतरी नवीन करण्याची धडपड, अस्वस्थता, एकाग्रता, चिंता आणि उत्साह अशा अनेक भावनांचा अनुभव या प्रवासात येतो, असे त्याने म्हटले आहे.
दिग्दर्शकाने शूटिंग संपल्याचे जाहीर केल्यानंतर एक प्रकारची पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी नव्या प्रवासाची गरज असते. अशा सर्जनशील प्रवासांमधील शांत वेळेत कलाकाराला संयम आणि कृतज्ञता या गोष्टी शिकाव्या लागतात, असे आदिनाथने शेवटी म्हटले आहे. अभिनेत्याने पुढे चाहत्यांना ‘रामायण’ हा सिनेमा बघण्याचे आवाहन केले आहे.
चार दिवसांतील कमाईची आकडेवारी
दरम्यान, ‘रामायण’ या सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचे तर एका अहवालानुसार, या सिनेमानं प्रदर्शनाच्या चार दिवसांत भारतात २३८.३५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, त्याची एकूण कमाई २८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. परदेशातील कमाईसह चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ४९९.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील ‘रामायण’ हा सध्या त्याचा तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply