सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक अजब व्हिडीओ आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये जे काही दिसले आहे ते पाहून अनेकजण चकित झाले आहेत. सोबतच या व्हिडीओत जो दावा करण्यात आला आहे, त्यावरही मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.
व्हिडीओत नेमके काय आहे
समोर आलेल्या व्हिडीओत २० वर्षांपूर्वीच्या तुपाचा एक डबा दाखवण्यात आला आहे. हा डबा तब्बल २० वर्षांपासून बंद होता, असा दावा करण्यात आला आहे. २००६ मध्ये संबंधित व्यक्तीच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनीच या डब्यात तूप ठेवले होते. आता हा डबा उघडण्यात आला आहे, असे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून आता तूप किती वर्षे टिकू शकते, असे विचारले जात आहे.
तूप की चीज? नेटकऱ्यांमध्ये दोन गट
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी शुद्ध तूप आणि मध योग्य पद्धतीने साठवल्यास दीर्घकाळ टिकू शकतात, असे म्हटले आहे. तर काहींनी व्हिडीओमध्ये दिसणारा पदार्थ तुर्कीमधील पारंपरिक ‘तुलुम चीज’ हा पदार्थ असल्याचा दावा केला आहे. काही वापरकर्त्यांनी त्यातील दुधाचे घटक पाहून तो तूप नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारा पदार्थ हा २० वर्षे जुने तूप असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही किंवा त्याची स्वतंत्रपणे पडताळणीही करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आयुर्वेदात जुन्या तुपाला ‘पुराण घृत’ असे म्हटले जाते. १० ते १५ वर्षे जुने तूप ‘कुंभसर्पि’ म्हणून ओळखले जाते. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये अशा तुपाचा उपयोग काही औषधे तयार करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. मानसिक आरोग्य, त्वचेचे विकार आणि जखमांवरील उपचारांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply