सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पन्नालालचा निरोप घेऊन भाट कुटुंब गावी परतले

पन्नालालला गोशाळेत ठेवल्यानंतर भाट कुटुंबीय गावी परतले. उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने कुटुंबावर संकट ओढवले; पन्नालाल परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवणार.

पन्नालालचा निरोप घेऊन भाट कुटुंब गावी परतले

अनेक वर्षांपासून ज्याच्यासोबत संसाराचा गाडा ओढला, त्या पन्नालालचा निरोप घेत भाट कुटुंबीय अखेर बुधवारी (ता. ४) मूळ गावी परतले. कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाढवलेल्या पन्नालालला नाशिकमध्येच सोडून जाताना भाट कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

पन्नालाल गोशाळेत

श्री कालिका देवी यात्रोत्सवात पन्नालालच्या माध्यमातून भाट कुटुंबीय भाविकांचे मनोरंजन करत होते. पशुसंवर्धन कायद्यांतर्गत पन्नालालला ताब्यात घेत त्याची रवानगी गोशाळेत करण्यात आली. पन्नालालच्या शोमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. पन्नालालपासून दुरावल्याने रोजगाराचे साधन हिरावले गेले. नाशिकसारख्या मोठ्या शहरात राहण्याची पर्यायी व्यवस्था नाही. खिशात पैसा नसल्याने राहणे व खाण्यापिण्याचा खर्च तसेच न्यायालयीन लढ्यासाठी वकिलाची फी भरण्याचीही आर्थिक क्षमता या कुटुंबाकडे उरलेली नाही. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये दिवस काढणे कठीण झाल्याने भाट कुटुंबाने मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला.

न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार

गावी जाण्यापूर्वी कुटुंबाने पन्नालालची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे दीपक डोके सोबत होते. कुटुंबाने नातलग व मित्रपरिवाराच्या सहाय्याने आर्थिक मदत उभी करून पन्नालालला पुन्हा मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. पन्नालालला न्याय मिळवून देण्याची लढाई थांबणार नसली, तरी या लढ्यासाठी आधी पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या पन्नालाल गोशाळेत आहे. एका मुक्या जीवाच्या प्रकरणात त्याच्या माणसांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या परिस्थितीची दखल कोण घेणार, असा प्रश्न समाजाच्या विविध स्तरांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance