नाशिक येथील स्टेप फाउंडेशनने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील किरमिरा (पाडवीपाडा) येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या काळात पार पडलेला हा संस्थेचा नववा सांस्कृतिक देवाण-घेवाण उपक्रम ठरला.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी या उपक्रमात विविध सामाजिक मदतकार्य करण्यात आले. यात १८ निराधार व्यक्तींना किराणा किट, १७० कुटुंबांना दिवाळी फराळ, १५० हून अधिक साड्या आणि लुगड्यांचे वाटप, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आरोग्य व स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.
आरोग्य, कायदा आणि ग्रामविकासावर मार्गदर्शन
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रशांत मुसळे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले, तर ॲड. गोरक्ष मटाले यांनी मोफत कायदेशीर मदतीबाबत माहिती दिली. गोकुळ मेदगे यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या २५ स्वयंसेवकांनी गावात दोन दिवस मुक्काम करून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply