उल्हासनगर, ६ नोव्हेंबर : शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार, कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर युवासैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर येथील सार्वजनिक मित्रमंडळाच्या सभागृहात पदनियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख रमेश डोंगरे, अनिल भोईर, भीमसेन मोर, राजेंद्र शाहू, विधानसभा प्रमुख जानू मानकर, महानगरप्रमुख आबा साबळे, अंबरनाथ पश्चिमचे शहरप्रमुख संदीप पगारे, अंबरनाथ पूर्वचे शहरप्रमुख संतोष शिंदे, कल्याण पूर्वचे शहरप्रमुख हेमंत चौधरी, उल्हासनगर पश्चिमचे शहरप्रमुख शिवाजी जावळे, उल्हासनगर पूर्वचे शहरप्रमुख प्रशांत धांडे, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, उपतालुकाप्रमुख प्रभाकर पाटील आणि युवासेनेचे कल्याण पूर्व शहर अधिकारी नीरज कुमार उपस्थित होते.
कल्याण पूर्व लोकसभा स्तरावरील नियुक्त्या
कल्याण पूर्व लोकसभा स्तरावर जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणून प्रवीण गोसावी, जिल्हा संघटक अधिकारी म्हणून चंद्रकांत भोईर आणि अॅड. विनोद जावळे, तर जिल्हा सचिव म्हणून अॅड. राजप्रकाश महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंबरनाथ आणि उल्हासनगर स्तरावरील नियुक्त्या
अंबरनाथ विधानसभा स्तरावर विधानसभा अधिकारी म्हणून महेश दुरगुडे, विधानसभा समन्वयक म्हणून बचितर सिंग रहाल, शहर अधिकारी म्हणून प्रतीक लोटलीकर, उपशहर अधिकारी म्हणून अजय मोरे आणि ओम घोणे, विभाग अधिकारी म्हणून हर्ष मांडवकर, तर शाखा अधिकारी म्हणून रोहन साळवी यांची नियुक्ती झाली आहे. उल्हासनगर पूर्व स्तरावर शहर अधिकारी म्हणून अॅड. दाहिर रामटेके, शहर समन्वयक म्हणून अजय भीमसेन मोरे, डिजिटल समन्वयक म्हणून अभिषेक मोरे, शहर संघटक म्हणून निरंजन पाटील, उपशहर अधिकारी म्हणून व्यंकेश गुरव आणि महेश घोरपडे, विभाग अधिकारी म्हणून अभिषेक अटकळे, प्रेम पाटील, प्रथमेश नवसे, जय मोरे आणि पालानी पांडी, उपविभाग अधिकारी म्हणून सुमित खत्री, अजित नायडू आणि अक्षय ताजपुरे, तर शाखा अधिकारी म्हणून विशाल पत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. उल्हासनगर पश्चिम स्तरावर शहर अधिकारी म्हणून अॅड. महेश फुंदे, तर विभाग प्रमुख म्हणून विकास दगडू हनवते आणि संतोष जानू डुकले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply