सातारा येथे पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या सोहळ्यात हिंदू जनजागृती समितीच्या प्रा. भक्ती दीपक डाफळे यांना नवदुर्गा सन्मान २०२६ ने गौरवण्यात आले. धर्मप्रसार, हिंदू संघटन आणि समाजहित या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. याच सोहळ्यात जिल्ह्यातील आणखी आठ महिलांचाही सन्मान करण्यात आला.
सन्मान सोहळ्यातील मान्यवर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि मुंबई येथील दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या अधीक्षक अभियंता संध्या सापटणेकर यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख, दिलीप आफळे, विनायक चिकलगे, शिवाजीराव भोसले, प्रशांत तुपे, प्रेमचंद पालकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जयंत देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डाफळे यांचे कार्य
प्रा. भक्ती डाफळे या आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक, हिंदू संघटन तसेच सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. हा सन्मान आपले गुरुदेव आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply