करवा चौथ म्हणजे हातावर नवऱ्याच्या प्रेमाने रंगलेली मेहंदी, चंद्राची वाट आणि पतीच्या हातून पाणी पिऊन व्रत सोडण्याचा खास क्षण! पण उत्तर प्रदेशातील IPS अधिकारी अंशिका वर्मा यांना त्यांचा पहिला करवा चौथ पतीपासून दूर राहून साजरा करावा लागला. त्यांच्या पतीची पोस्टिंग दुसऱ्या शहरात असल्याने त्यांना साधेपणाने हे करवा चौथ साजरे करावे लागले. याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोस्टिंग
अंशिका वर्मा सध्या बरेली येथे एसपी साऊथ म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती IPS कृष्ण कुमार बिश्नोई म्हणजेच के. के. बिश्नोई हे बिजनौरचे पोलिस अधीक्षक आहेत. दोघांचीही वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोस्टिंग असल्याने करवा चौथच्या दिवशीही त्यांना भेटता आलं नाही.
त्यामुळे अंशिका वर्मा यांनी व्हिडिओ कॉलवर आपला करवा चौथ साजरा केला. या कॉलचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. के. के. बिश्नोई यांनीही हा खास क्षण आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी Silent Sacrifices & Duty Calls असं कॅप्शन लिहिलं आहे. म्हणजेच कर्तव्य बजावताना करावी लागणारी शांत तडजोड आणि जिल्ह्याला असणारी गरज, असा याचा अर्थ होतो. अंशिका यांनी ही पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर केली आहे.
पहिलं करवा चौथ आणि कर्तव्याला प्राधान्य
विशेष म्हणजे, या दोघांचं लग्न याच वर्षी 29 मार्च 2026 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे झालं होतं. त्यामुळे लग्नानंतरचं हे त्यांचं पहिलं करवा चौथ होतं. अंशिका वर्मा या 2021 बॅचच्या IPS अधिकारी असून के. के. बिश्नोई हे 2018 बॅचचे अधिकारी आहेत. लग्नानंतरचं पहिलं करवा चौथ असूनही दोघांनी आपापल्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिलं. कमेंट्समध्ये चाहत्यांनी आशीर्वाद दिले आहेत आणि त्यांच्या त्यागाला सलाम केला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply