सीमांकन विधेयकावर देशभरात चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भूमिकेत नरमाई आणली आहे. या विधेयकाला मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पाठिंबा गरजेचा मानला जात आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वडेट्टीवार यांची यापूर्वीची बोचरी टीका
या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवार यांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. सत्तेसाठी जगायचे आणि सत्ता घेऊन मरायचे, एवढाच विचार त्यांच्या डोक्यात असतो, अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.
माफी मागण्याची तयारी
मात्र, आता वडेट्टीवार यांनी आपल्या विधानाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी सीमांकन विधेयकाला विरोध केला, तर मी त्यांची जाहीरपणे माफी मागेन. एवढेच नाही, तर त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागेन, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
माझा शरद पवार यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही, असे त्यांनी सांगितले. देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहिला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. त्यामुळे पवार साहेबांनी देशाच्या लोकशाहीचा विचार करून या विधेयकाला पाठिंबा देऊ नये, अशी हात जोडून विनंती असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा