मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशभरातील राजकीय वातावरण तापले असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. इंडिया आघाडीतील प्रमुख नेते चेन्नईत पोहोचले असून त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.
या भेटीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील इतर नेते सहभागी झाले होते. भेटीचे फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या वर्तुळातही या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
स्टॅलिन आणि पवारांची भूमिका ठरणार महत्त्वाची
एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घेतल्यास केंद्र सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष अधिवेशनात काय होणार?
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चेन्नईतील बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडेही लक्ष आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईतही बैठक होणार असल्याचे समजते.
प्रतिक्रिया व्यक्त करा