सीमांकन विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस इंडिया आघाडीत एकजूट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी आघाडी आणत असलेल्या सीमांकनाला इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेने पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, स्टॅलिन यांनी पुन्हा त्यावर विचार करावा आणि सीमांकनाला विरोध करावा, यासाठी काँग्रेसकडून त्यांची मनधरणी केली जात आहे.
चेन्नईत तासभर बैठक
यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधींसह काँग्रेसचे प्रमुख नेते चेन्नईला रवाना झाले. तेथे एका हॉटेलमध्ये एम. के. स्टॅलिन यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले.
इंडिया आघाडीतील सहा पक्षांचे नेते स्टॅलिन यांच्या चेन्नईस्थित निवासस्थानी पोहोचले होते. सीमांकन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत त्यांनी स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली. स्टॅलिन यांनी आदल्या दिवशीच या विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका आमदाराने सांगितले की, शरद पवारही या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यानंतर सकाळी राहुल गांधींनी स्टॅलिन यांना भेटण्यास जाणार असल्याची माहिती दिली होती.
बैठकीनंतर काय घडले?
काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक झाल्यानंतर स्टॅलिन हे आपल्या निवासस्थानी परतले. स्टॅलिन आणि उदयनिधी हे एकाच गाडीतून घरी निघाले, तर इंडिया आघाडीचे नेते चेन्नईतील एका हॉटेलमध्ये थांबले. या बैठकीत स्टॅलिन यांनी आपला निर्णय बदलला का आणि काँग्रेसच्या मनधरणीच्या प्रयत्नांना यश आले का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा