सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ८० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बहुतांश धरणांमध्ये ९० ते १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे आगामी सात महिने धरणांमधील उपलब्ध पाण्याच्या वापराचे आतापासूनच काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
टँकरने पाणीपुरवठ्याची शक्यता
पाण्याचे नियोजन वेळेत झाले नाही, तर सर्वच तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. दुष्काळी परिस्थितीमुळे धरणांतील पाण्याच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. तसेच बहुतांश प्रमुख नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहेत. काही ठिकाणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील पाणीही कमी होत आहे.
पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे
पुढील सात महिन्यांचा विचार करता धरणांतील उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटेकोरपणे करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत शेती आणि इतर वापरासाठी नियोजन करणे आवश्यक झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा