पारंपरिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. माडसांगवी (नाशिक) येथे आयोजित कृषीथॉन-२०२६ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
कृषीथॉन-२०२६ चे उद्घाटन
उद्घाटन सोहळ्याला आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे आणि नितीन पवार, माजी आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुळाणे आणि आयोजक संजय न्याहारकर यांच्यासह कृषिसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सरपंचांनी एआय गावशिवारात न्यावे
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान गावशिवारात पोहोचवण्याची जबाबदारी सरपंचांनी घ्यावी, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले तर शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा