देशात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
सुळे यांची अट; इंडिया आघाडीशी चर्चा
डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ होणार असेल, तर आपल्या पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा असेल, असे सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी सांगितले होते. या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
पवारांची भूमिका आणि आव्हाडांचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन ही अनिवार्य प्रक्रिया असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पक्षाचा पाठिंबा असण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधेयक संसदेत मांडल्यानंतर या पक्षाच्या खासदारांनी कोणती भूमिका घेतली, हे स्पष्ट होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा