डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराजी उफाळून आली असून, पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून पक्षातून आलेला हा पहिलाच राजीनामा मानला जात आहे.
विचारधारेशी तडजोड कशी करणार, असा सवाल
राजीनामा पत्रात खामकर यांनी पक्षाच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. भाजपला डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी तडजोड कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षावर नाराज होऊन आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पक्षातील अंतर्गत नाराजी समोर
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. खामकर यांच्या राजीनाम्यामुळे ही नाराजी आता उघड झाली आहे. या घडामोडीकडे पक्षातील अंतर्गत असंतोषातून आलेले पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा