तुम्ही कार किंवा दुचाकी चालवत असाल, तर वाहन विम्याबाबत समोर येणारी ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. केंद्र सरकार वाहन विम्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. नव्या प्रस्तावानुसार, वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
नियम मोडणाऱ्यांना आर्थिक फटका
वाहतुकीचे नियम मोडल्यास किंवा वारंवार ई-चलन जारी झाल्यास वाहन विम्याचा हप्ता वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांना विम्यासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे वाहन चालवताना नियम पाळणे आता अधिक महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
याशिवाय, वाहनधारकांना विमा घेण्याची प्रक्रिया अधिक सोयीची व्हावी, यासाठी दीर्घकालीन विमा पॉलिसीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचाही विचार केला जात आहे.
पेट्रोल पंपांवरही नवा नियम?
पेट्रोल पंपांवर ‘नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ म्हणजेच विमा नसल्यास इंधन मिळणार नाही, अशी व्यवस्था लागू करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. या संभाव्य बदलांमुळे वाहनचालकांवर नियम पाळण्याची जबाबदारी अधिक वाढू शकते. मात्र, हे बदल प्रत्यक्षात लागू होणार का आणि त्याबाबतचे नियम काय असतील, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा