संसदेत सादर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची प्रत समोर आली असून, देशाच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे आहेत. या विधेयकानुसार लोकसभेच्या जागांमध्ये सध्याच्या संख्येच्या तुलनेत तब्बल ५० टक्के वाढ होणार आहे. त्यासोबतच महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
जागांची संख्या किती होणार?
विधेयकानुसार लोकसभेतील जागांची कमाल मर्यादा ८५० पर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यामध्ये राज्यांमधून ८३५ जागा आणि केंद्रशासित प्रदेशांमधून १५ जागा असतील. राज्यांमधील विधानसभा जागांची संख्याही ६५० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागांचे प्रमाण १९७१ च्या जनगणनेच्या आधारे कायम राहील, तर मतदारसंघांच्या सीमा २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवरून नव्याने निश्चित केल्या जातील.
नव्या सीमा कधी लागू होणार?
या प्रक्रियेमुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी नव्या सीमा लागू होतील आणि मतदारसंघांच्या सीमा २०५१ पर्यंत गोठवलेल्या राहतील. या विधेयकात स्वतंत्र पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. या आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा माजी न्यायमूर्ती भूषवतील. हे विधेयक लवकरच लोकसभेत सादर केले जाईल आणि त्यामुळे भारतीय लोकशाहीचे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा