नऊवारी साडी हे महाराष्ट्राचे पारंपरिक वैभव आहे. मात्र अनेक महिलांना ती नेसताना गोंधळ होतो. योग्य पद्धत माहीत असल्यास नऊवारी साडी सहज आणि सुंदर नेसता येते. या सात सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही परफेक्ट नऊवारी लूक मिळवू शकता.
## नऊवारी साडी नेसण्याच्या ७ स्टेप्स
सर्वप्रथम आवडीची योग्य नऊवारी साडी निवडा. पैठणी, कॉटन, सिल्क किंवा पारंपरिक काठापदराची नऊवारी साडी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर साडीचे एक टोक हातात घेऊन कमरेभोवती गुंडाळण्यास सुरुवात करा. साडीचा पदर खांद्यावर घेण्यासाठी पुरेसे कापड बाजूला ठेवा.
त्यानंतर साडीचा पहिला पदर कमरेच्या एका बाजूला व्यवस्थित खोचा. साडी सैल होणार नाही याची काळजी घ्या. उरलेले कापड पाठीमागून पुढे आणा आणि कमरेभोवती व्यवस्थित गुंडाळा. यामुळे नऊवारी साडीचा पारंपरिक आकार तयार होतो.
साडीचा खालचा भाग पायांच्या मधून मागच्या बाजूला घेऊन जा. त्याच्या व्यवस्थित काचा घालून त्या कमरेच्या मागील बाजूस खोचा. त्यानंतर साडीचा उरलेला भाग खांद्यावर घेऊन त्याच्या व्यवस्थित घड्या घाला आणि पदर खांद्यावर पिनने सुरक्षित करा.
## लूक पूर्ण करण्यासाठी दागिने
नऊवारी लूकला दागिन्यांची जोड द्या. नऊवारी साडीवर नथ, ठुशी, चंद्रहार, हिरव्या बांगड्या घाला आणि अंबाड्यात गजरा माळा. कपाळावर चंद्रकोर लावून तुमचा मराठमोळा लूक पूर्ण करा.
प्रतिक्रिया व्यक्त करा