आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. आव्हाड म्हणाले की, या विषयावर त्यांची शरद पवार यांच्याशी यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. मात्र तेव्हा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की, डिलिमिटेशन हे घटनात्मक असतं आणि ते करावंच लागतं. त्याला काही पर्याय नसतो.
आपापले मतदारसंघ बांधायला शिका
पवार यांनी त्यावेळी असंही म्हटलं होतं की, आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असं चालायचं. ही सगळी चर्चा अनौपचारिक होती, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. आव्हाड म्हणाले की, ते उघडपणे सांगतात, पवार हे त्यांचे दैवत आहेत. त्यांच्या दैवताची भूमिका जी, तीच त्यांची भूमिका आहे.
आव्हाड यांची भूमिका
आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, पवार यांची जी भूमिका असेल, तीच त्यांची भूमिका असेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा