केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभा ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर चालेल, तर राज्यसभा २ आणि ३ डिसेंबरला बसेल. या अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे बिल मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज आहे. यापूर्वीही हे बिल संसदेत सादर झाले होते, पण तेव्हा ते मंजूर होऊ शकले नव्हते. मात्र आता मंजुरीसाठी लागणारी मते जुळवण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.
DMK ची भूमिका ठरणार निर्णायक
तामिळनाडूतील प्रमुख पक्ष DMK या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. DMK कडे सध्या २२ खासदार आहेत, त्यामुळे पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक राज्यातील जागा ५० टक्क्यांनी वाढवल्या तर बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करू, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे DMK बिलाच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसने DMK वर जोरदार टीका केली आहे. DMK गद्दार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसशी फाटले, आता बदला घेण्याची संधी?
DMK हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष होता. पण यावर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या DMK ने आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्या निवडणुकीत थलपती विजय यांचा TVK सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण त्यांना पूर्ण बहुमत नव्हते. त्यानंतर विजय यांनी काँग्रेससोबत युती करून तामिळनाडूत सरकार स्थापन केले. यावरून DMK नाराज झाला. काँग्रेसने आपला विश्वासघात केल्याचे सांगत पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. आता याचाच बदला घेण्याची संधी DMK कडे असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे DMK या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांनी तसे संकेतही दिले आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा