राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नियोजित आरोग्य तपासणीसाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट केवळ नियमित तपासणीचा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी कफचा त्रास
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफचा त्रास जाणवला होता. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
नियमित देखभालीचा भाग
आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुन्हा तपासणीसाठी ते रुग्णालयात आले आहेत. ही भेट त्यांच्या नियमित आरोग्य देखभालीचा भाग असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा