मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला आहे. सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी महापालिकेच्या ईमेल पत्त्यावर आलेल्या या मेलमध्ये मुख्यालय, महापौर कार्यालय, सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, मुंबईतील मेट्रो स्थानके आणि महालक्ष्मी रेसकोर्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
चार महिन्यांतील पाचवी धमकी
गेल्या चार महिन्यांत महापालिकेला आलेला हा पाचवा धमकीचा मेल आहे. यापूर्वीच्या धमक्यांनंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. तरीही धमक्या सुरूच असल्याने शहराच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
ठोस उपाययोजनांकडे लक्ष
वारंवार अशा धमक्या येत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा