चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर चाहते मनापासून प्रेम करतात, पण काही वेळा हे प्रेम मर्यादा ओलांडते. सोशल मीडियाच्या काळात कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे चाहत्यांना सहज कळते आणि कलाकारही आपल्या चाहत्यांसाठी सतत छायाचित्रे शेअर करत असतात. मात्र, अशाच एका चाहत्याच्या वेडेपणामुळे नव्वदच्या दशकातील अभिनेत्री पूजा बेदी हिला भीतीदायक अनुभवाला सामोरे जावे लागले होते.
लिलावात बिकिनीची खरेदी
मुंबईत एका खास लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात कलाकारांनी वापरलेल्या वस्तू आणि कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या लिलावाचे सूत्रसंचालन अर्चना सिंह यांनी केले. पूजा बेदी हिने ‘लुटेरे’ चित्रपटात परिधान केलेली बिकिनीही या लिलावात ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने ही बिकिनी १५०० रुपयांना विकत घेतली. बिकिनी का विकत घेतली, असे त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर ऐकून उपस्थित सगळेच हैराण झाले. तो म्हणाला की, अभिनेत्रीला प्रत्यक्षात मिठी मारता येणार नाही, त्यामुळे किमान तिच्या बिकिनीला तरी मिठी मारता येईल.
चाहता थेट घरी पोहोचला
तो चाहता एवढ्यावरच थांबला नाही. एके दिवशी तो ती बिकिनी हातात घेऊन थेट पूजा बेदी यांच्या घरी पोहोचला. अभिनेत्रीने स्वतः दरवाजा उघडला आणि तो थेट घरात शिरला. पूजा बेदी यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि समजावून सांगितले, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एकतर्फी प्रेमात त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तो अभिनेत्रीला सतत पत्रे पाठवत असे. पूजा बेदी यांनी फरहान फर्निचरवाला यांच्याशी लग्न केल्यानंतर मात्र त्याने तिचा पाठलाग सोडला.
प्रतिक्रिया व्यक्त करा