‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली दोन बाळांना सांभाळताना दिसते. विमल बाळांसोबत खेळत असताना सायलीला आवाज देते, पण तिचे लक्ष नसते. अचानक एक बाळ रडू लागल्यावर सायलीची तंद्री तुटते. विमल तिला म्हणते की, बाळ रडायला लागल्यावर तुला लगेच लक्षात आले, तुझ्यामध्ये आईपण खूप छान मुरले आहे.
सायली सांगते की, ती बाळांच्या सवयींबद्दलच लिहत होती. एका बाळाला तिच्या स्पर्शाशिवाय शांत राहता येत नाही, तर दुसरे बाळ तिने नुसता आवाज दिला तरी शांत राहते. त्यानंतर कल्पना विमलला बोलावते आणि विमल खाली जाते. विमल गेल्यावर दोन्ही बाळे रडू लागतात आणि सायलीला त्यांना एकटीलाच सांभाळताना चांगलीच तारांबळ उडते.
अश्विनबद्दल घरात चिंता
खाली सगळे अश्विनबद्दल बोलत असतात. कल्पनाला अश्विनची फार चिंता वाटत असते. तो आपले काही बरेवाईट करणार नाही ना, अशी शंका तिला येते. अर्जुन डीएनए टेस्टचे रिपोर्ट आणायला गेलेला असतो. रिपोर्टमध्ये काय येईल आणि त्याचा परिणाम अश्विनवर काय होईल, या विचाराने कल्पना त्रस्त झालेली असते.
अश्विन आपल्या बोलण्यावर ठाम आहे. हे बाळ त्याचे नाही, असेच त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे डीएनए रिपोर्ट येईपर्यंत घरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
सायली आणि कल्पनामधील तणाव
सायलीने बाळांची मान नीट धरली नाही, हे कल्पना आणि प्रतिमाच्या लक्षात येते. पण तिला कसे सांगायचे हे त्यांना कळत नाही. नंतर कल्पना सायलीला ओरडते की, या बाळाला सांभाळायच्या नादात तू तुझ्या बाळाकडे दुर्लक्ष करत आहेस. यावर सायली म्हणते की, या बाळाला माहित सुद्धा नाही की तुम्ही तिचा किती तिरस्कार करता, पण तरीही तिला तुमचे प्रेम हवे आहे. सायलीच्या या बोलण्यावर कल्पना निशब्द होते.
दुसरीकडे अर्जुन रिपोर्टमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. त्याचवेळी प्रियाला वैतागलेल्या अश्विनच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार असल्याचे या भागातून समोर येत आहे. त्यामुळे कथानकात पुढे काय वळण येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा