नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही आपली पकड कायम ठेवत आहे. मात्र प्रदर्शनाच्या २१व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, तिसऱ्या बुधवारी म्हणजे २१व्या दिवशी चित्रपटाने ९.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्यांदाच या चित्रपटाचे एका दिवसाचे कलेक्शन एका आकड्यात आले आहे.
या चित्रपटाची २१ दिवसांची एकूण नेट कमाई आता ९८२.५५ कोटी रुपये झाली आहे. चित्रपट ५ नोव्हेंबरला दिवाळीपूर्वी प्रदर्शित झाला होता. पहिला आठवडा सर्वात शानदार ठरला होता आणि पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५६४.६५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने २९९.१० कोटी रुपयांची कमाई केली होती.
तिसऱ्या आठवड्यातील कमाईचा आलेख
तिसऱ्या आठवड्याच्या वीकडेजवर कमाई कमी होऊ लागली होती. तिसऱ्या सोमवारी चित्रपटाने १२.७० कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर तिसऱ्या मंगळवारी चित्रपटाने वेग वाढवत १७.५० कोटी रुपयांची कमाई केली. पण तिसऱ्या बुधवारी कमाईला मोठा धक्का बसला आणि आकडा ९.६० कोटींवर आला.
तिसऱ्या बुधवारीही नवा विक्रम
कमाईत घसरण नोंदवली गेली असली तरी चित्रपटाने तिसऱ्या बुधवारी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ‘गदर २’ (८.६ कोटी), ‘पठाण’ (६.७५ कोटी), ‘छावा’ (६.१९ कोटी) आणि ‘स्त्री २’ (५.६८ कोटी) यांना मागे टाकत ‘रामायण’ तिसऱ्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणारी आठवी फिल्म बनली आहे.
आता चित्रपटाला १००० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी आणखी १८ कोटी रुपये कमवावे लागतील. चौथ्या वीकेंडपर्यंत चित्रपट हा आकडा पार करेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ‘धुरंधर २’नंतर चार अंकी कमाई करणारा तो बॉलीवूडचा दुसरा चित्रपट बनेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा