माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते. आता तिने काळ्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला रॉयल सुपरस्टार लेडी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त तिच्याच फोटोंची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर कायम सक्रिय
माधुरी आता मोठ्या पडद्यावर फारशी सक्रिय नाही, मात्र सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती नियमितपणे पोस्ट करते. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ती स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला लाईक्स आणि कमेंटचा चांगला प्रतिसाद मिळतो.
साठीच्या उंबरठ्यावरही तेच सौंदर्य
काळ्या साडीतील तिचा लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त माधुरीचाच बोलबाला होता. आजही साठीच्या उंबरठ्यावर तिचे सौंदर्य तसेच टिकून असल्याचे चाहते म्हणत आहेत. तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा