, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

शापित गाणं ‘ग्लूमी संडे’, ऐकून शंभराहून अधिक बळी?

हंगेरीतील 'ग्लूमी संडे' हे गाणे ऐकल्यानंतर शंभराहून अधिक लोकांनी जीव दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या गाण्यावर जगभरात बंदी घालण्यात आली होती, पण त्यामागचे सत्य आजही रहस्यच आहे.

शापित गाणं ‘ग्लूमी संडे’, ऐकून शंभराहून अधिक बळी?

गाणे आणि संगीत हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुख असो किंवा दुःखाचा प्रसंग, प्रत्येकाला आठवते ते गाणेच. अनेकदा गाणे ऐकून मनुष्य दुःख विसरतो आणि आनंद साजरा करतो. मात्र जगात असे एक गाणे आहे, जे ऐकल्यानंतर शंभराहून अधिक लोकांनी जीव दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या गाण्यावर जगभरात बंदी घालण्यात आली होती. या गाण्याला जगातील सर्वांत दुःखद गाणे किंवा शापित गाणेही म्हटले जाते.

१९३० मध्ये जन्मलेली उदास धून

१९३० ची गोष्ट आहे. हंगेरीचा संघर्षशील पियानोवादक रेज्सो सेरेस आपल्या घरातील छोट्या खोलीत बसला होता. मनोभंग झालेला होता आणि आयुष्यात आशेचा किरण दिसत नव्हता. त्याचवेळी त्याने एक धून तयार केली. एवढी दर्दभरी आणि उदास की ऐकणाऱ्यांच्या काळजातच ती घुसली. रेज्सो सेरेस आणि लैजलो या दोघांनी मिळून हे गाणे लिहिले. या गाण्याचे नाव होते ‘ग्लूमी संडे’. १९३५ मध्ये जेव्हा या गाण्याचे रेकॉर्ड पहिल्यांदा बाजारात आले, तेव्हा एकच खळबळ उडाली. हे गाणे ऐकणाऱ्यांना या धूनने खोल अंधारात ढकलून दिले. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. गाणे आल्यावर त्याच वर्षी एका व्यक्तीने जीव दिला. त्यानंतर काही महिन्यांतच १७ लोकांनी जीव दिला होता. अनेकांनी तर चिठ्ठीत या गाण्याचे बोल लिहिले होते. एका अहवालानुसार, या गाण्याच्या संगीतकाराच्या प्रेयसीनेही जीवन संपवले होते.

बंदी आणि पुढील कहाणी

‘ग्लूमी संडे’ ऐकल्यानंतर त्याच्या प्रकाशकानेही पहिल्यांदा आयुष्य संपवले. त्याने सुरुवातीला गाणे खरेदी करण्यास नकार दिला होता, मात्र नंतर काही काळाने त्याने प्राणत्याग केला. १९३३ मध्ये हे गाणे आल्यानंतर अशा घटना अधिक वाढत गेल्या. ३० मार्च १९३६ रोजी टाइम मासिकात त्यावर एक अहवाल छापून आला होता. त्यात हे गाणे बाजारात आल्यानंतर दोन वर्षांतच १७-१८ लोकांनी जीव दिल्याचे म्हटले होते. यातील सर्वाधिक प्रकरणे हंगेरीतील होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी १९३६ मध्ये या गाण्यावर एक लेखही छापून आला होता. गाण्याची लोकप्रियता वाढत होती. त्यामुळे अमेरिकेत हे गाणे इंग्रजी बोलांसह सादर करण्यात आले. १९३६ मध्ये अमेरिकेत हे गाणे वाजले. या गाण्याचे बोल सॅम एम. लेव्हिस यांनी लिहिले होते आणि हल केंपने हे गाणे गायले होते. गाणे इंग्रजीत आल्यावर ते अधिकच लोकप्रिय झाले आणि जीव संपवण्याचे प्रकारही वाढले होते. ज्या मुलीने हे गाणे लिहिले होते, तिनेही जगाचा निरोप घेतला होता. नंतरच्या काळात हे गाणे ऐकून शंभराहून अधिक लोकांनी जीव दिल्याचे मानले जाते. मात्र हे गाणे खरोखरच प्राणघातक होते की निव्वळ योगायोग, हे आजही एक रहस्यच आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance