मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील भोजन व्यवस्थेवरून शाकाहारी आणि मांसाहारी वाद पुन्हा पेटला आहे. गेल्या २५ वर्षांपासून महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी जेवण वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.
भाजपला घेरले, वाद चिघळला
या मुद्द्यावरून काँग्रेस आणि मनसेने भाजपला घेरले असून वाद चिघळला आहे. महासभेतील भोजन व्यवस्था हाच वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
गेल्या २५ वर्षांची परंपरा मोडल्याचा आरोप होत असताना या प्रकरणावर महापालिकेकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply