मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच: कृषीमंत्री भरणे

नमो शेतकरी योजना आणि पाच हजारांची अग्रीम रक्कम एकच असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच: कृषीमंत्री भरणे

राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाने होरपळत आहेत. खरीप हंगामातील पीक हातातून गेले असून पेरणी करूनही पीक न आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळीआधी शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली आहे, तर काही शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित आहेत.

अशा वेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमो शेतकरी सन्मान योजना आणि अग्रीम रक्कम एकच असल्याचे विधान केले आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम ही शेतकरी सन्मान योजनेतूनच दिली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषीमंत्री नेमके काय म्हणाले?

भरणे म्हणाले की, प्रति शेतकऱ्याला दिलेली पाच हजार रुपयांची रक्कम तीच आहे, एकच आहे. ती काही वेगळी रक्कम नाही. मात्र, शेतकऱ्यांना नमो योजनेचेही पैसे देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अग्रीम म्हणून दिलेली पाच हजार रुपयांची रक्कम नमो शेतकरी योजनेचीच आहे का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, असे म्हणता येणार नाही, असे उत्तर भरणे यांनी दिले. भरणे हे नांदेड विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance