प्रादेशिक चित्रपटसृष्टीत सध्या नव्या सर्जनशीलतेचा उदय होत असून, प्रभावी कथांच्या माध्यमातून प्रादेशिक चित्रपट मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत आहेत. आसामी चित्रपटसृष्टीतही सशक्त पुनरागमन दिसून येत असल्याचे मत चित्रपटनिर्मात्या अंतरा जीजी चौधरी यांनी व्यक्त केले.
इफ्फीतील पत्रकार परिषद
गोव्यात सुरू असलेल्या ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ‘सुरज्यमुखी’ या चित्रपटासंदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
प्रादेशिक चित्रपटांना नव्या संधी
प्रभावी कथांमुळे प्रादेशिक चित्रपटांना नवा प्रेक्षकवर्ग मिळत असून, आसामी चित्रपटसृष्टीसह इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टींसमोरही नव्या संधी निर्माण होत आहेत, असे या चर्चेतून स्पष्ट झाले.
Leave a Reply