रविवार म्हणजे कुटुंबासोबतचा वेळ. कपूर कुटुंबाची रविवारची कौटुंबिक पार्टी सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी रविवारी कुटुंबासोबत जेवणाचा आनंद लुटला. या गेट-टुगेदरचे फोटो समाजमाध्यमांवर पसरत आहेत.
करीना आणि करिश्मा यांची आत्या रीमा जैन यांच्या घरी ही कौटुंबिक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला दोन्ही अभिनेत्रींसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती.
स्वयंपाकाची धुरा अरमान जैन यांच्याकडे
या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते चविष्ट जेवणाने. स्वयंपाकाची धुरा कोणत्याही व्यावसायिक शेफने सांभाळली नव्हती, तर कुटुंबातीलच सदस्य अरमान जैन याने ती सांभाळली. त्याने स्वतः सर्व रुचकर पदार्थ तयार केले होते. यावेळी खास सीफूडचे आयोजन करण्यात आले होते. अरमान जैन याने या पार्टीचे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. त्याच्या पोस्टवर अभिनेत्री करिश्मा कपूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अरमान जैन आहे तरी कोण?
अरमान जैन हा कपूर घराण्यातील असून तो एक फूड उद्योजक, सिनेमा निर्माता आणि होम कूक आहे. तो प्रसिद्ध व्यावसायिक महिला रीमा जैन आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. तो करिश्मा आणि करीना कपूर यांचा चुलत भाऊ आहे. त्याला स्वयंपाक करण्याची विशेष आवड असून त्याने आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले आहे. तो ‘द जंगली किचन’चा संस्थापक आहे.
Leave a Reply