मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मुंबईसह शहरांतील प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक

मुंबईसह देशातील अनेक शहरे प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत. सूक्ष्म कण फुप्फुसांपर्यंत पोहोचत असून प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येते.

मुंबईसह शहरांतील प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक

मुंबईसह देशातील अनेक शहरे प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत. महानगरांच्या विकासाच्या धुरात नागरिकांचा श्वास गुदमरू लागला आहे. हवेत मिसळणारे सूक्ष्म कण श्वासावाटे फुप्फुसांपर्यंत पोहोचत असल्याने कोट्यवधी लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

आयआयटीने उपग्रहाच्या साहाय्याने केलेल्या पाहणीत मुंबईत पीएम २.५ या सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले आहे. मुंबई आणि दिल्लीसह श्रीगंगानगर, रोहतक, श्रीनगर, बठिंडा, सिरसा, उमेरठ, हापूड, बुलंदशहर, फरीदकोट, सोनीपत, पानिपत, बल्लभगढ, ग्रेटर नोएडा आणि मुझफ्फरनगर या शहरांचाही प्रदूषित शहरांमध्ये समावेश आहे.

प्रदूषण वाढण्याची कारणे

वाढती बांधकामे, पेट्रोलियमची वाहतूक, डिझेल वाहनांचे उत्सर्जन आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे प्रदूषण वाढले आहे. दिवाळीत फटाक्यांमुळेही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते. दिवाळीत फटाक्यांमधून निघणारा धूर वर्षभराच्या वाहन प्रदूषणाइतका भीषण असतो, असे सांगितले जाते. फटाक्यांवर बंदी असूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दिवाळीत मुंबईत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त फटाक्यांची उलाढाल झाली.

आरोग्यावर परिणाम

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार फुप्फुसापर्यंत संसर्ग पोहोचल्याने दहा टक्के मुंबईकर रुग्णालयात दाखल झाले आहेत. पीएम २.५ हे सूक्ष्म कण शेकडो किलोमीटर प्रवास करू शकतात, त्यामुळे हे प्रदूषण शहरांपुरते मर्यादित न राहता आसपास २५ कोसापर्यंत पसरू शकते. जागतिक आकडेवारीनुसार प्रदूषणामुळे दर मिनिटाला तीन ते चार लोकांचा बळी जातो आणि एका दिवसात सुमारे ५,५०० मृत्यू होतात. कार्बन मोनॉक्साईड आणि इतर रसायनांनी युक्त धूर फुप्फुस आणि हृदयावर आघात करतो, डोळ्यांनाही इजा पोहोचवतो.

एका बाजूला कोकणात ब्ल्यू फ्लॅग मानांकनामुळे किनारपट्टी पर्यटनाला नवी आशा मिळाली आहे, कोकणातील पाच किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा मान मिळाला आहे आणि पश्चिम घाटाला जागतिक जैवविविधतेचा हॉट स्पॉट म्हणून गौरवले गेले आहे. दुसऱ्या बाजूला हवेतील प्रदूषण, नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण आणि कचऱ्यातून होणारे प्रदूषण कायम आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance