शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांवर अखेर मार्ग काढण्याच्या दिशेने राज्य शासनाने पाऊल टाकले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या प्रश्नांवर सखोल अभ्यास करण्यासाठी एका विशेष समितीची निर्मिती करण्यात येत आहे.
दहा सदस्यीय उच्चस्तरीय समिती
ही समिती दहा सदस्यांची असून तिला उच्चस्तरीय दर्जा देण्यात आला आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटना आणि त्यांच्या विविध मागण्या हे या समितीसमोरचे प्रमुख मुद्दे असतील. गेल्या १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून ही समिती स्थापन केली जात असून, त्याबाबतचा अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे.
कामाचे तास आणि DACP योजनेचा अभ्यास
समिती शासकीय डॉक्टरांच्या कामाच्या तासांचा तसेच DACP योजनेचा अभ्यास करणार आहे. समितीचा अभ्यास अहवाल तयार झाल्यानंतर आणि आयुक्तांचा अभिप्राय मिळाल्यानंतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply