भारतातील सर्वात लोकप्रिय पाण्याच्या ब्रँडपैकी एक असलेल्या बिस्लेरीचे पाणी सध्या चर्चेत आले आहे. बिस्लेरीच्या पाण्याचा नमुना पहिल्या चाचणीत अयशस्वी ठरला होता. त्या नमुन्यात रसायने आढळल्याचे समोर आले होते.
दुसऱ्या चाचणीत दिलासा
या प्रकरणात आता बिस्लेरीला मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याचा नमुना दुसऱ्या चाचणीत यशस्वी ठरला असून त्यात कोणतीही रसायने आढळून आली नाहीत. पाणी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. हे बाटलीबंद पाणी अन्न सुरक्षा मानकांचे पालन करते, असेही समोर आले आहे.
बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्यांच्या पाण्याचे नमुने यापूर्वी असुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले होते. आता नव्या चाचणीत ते अन्न सुरक्षा मानकांनुसार असल्याचे आढळले आहे.
सर्व ब्रँडची चाचणी होणार
या घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. देशातील सर्व ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याची चाचणी होणार आहे.
Leave a Reply