उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. प्रदीर्घ ओढाताणीनंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. सोमवारी दिल्लीत झालेल्या पहिल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला.
तीन श्रेणींमध्ये विभागणी
हा फॉर्म्युला तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. दोन्ही पक्षांमधील समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी झाली.
भाजपविरोधात नवी रणनीती
भाजपविरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने नवा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे. जागावाटपाची अंतिम यादी कधी जाहीर होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply