राज्यात हवामानात बदल झाला असून थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने राज्यभर गारठा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत इशारा दिला आहे.
जिल्ह्यांमध्ये दाट धुकं
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुकं पसरलं आहे. थंड वाऱ्यांमुळे सकाळपासूनच गारठा वाढला असून थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामानात झालेल्या या बदलाकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा ·पुण्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
तापमानात वाढीची शक्यता
पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या वाढलेला गारठा काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply