गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. केशोद-बालागाम मार्गावर खमीदाणा गावाजवळ भरधाव कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. कार उलटताच तिने पेट घेतला आणि या दुर्घटनेत कारमधील तीन जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही कार केशोद-बालागाम मार्गावरून जात होती. त्यावेळी खमीदाणा गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उलटली आणि कार उलटताच काही क्षणांत तिला आग लागली. आगीने कारला वेढल्याने आत बसलेल्या तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.
एका तरुणीचे प्राण वाचले
अपघाताच्या वेळी कारमधून बाहेर फेकली गेल्यामुळे एका तरुणीचे प्राण वाचले आहेत. मात्र, ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Leave a Reply