भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना विविध पदांवर संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील चार नेते कोण?
बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राहुल केंद्रे यांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. याशिवाय हर्षदा फरांदे आणि सिमता काळे या दोन महिला नेत्यांचीही वर्णी लागली आहे. त्यामुळे राज्यातील चार जणांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळाली आहे.
निवडींकडे संघटनात्मक दृष्टीने लक्ष
भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना स्थान मिळाल्याने या निवडींकडे संघटनात्मक पातळीवर लक्ष वेधले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a Reply