सोशल मीडियावर सध्या सोन्यात रेडियम पावडर मिसळल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, बुलियन असोसिएशनने या अफवा स्पष्टपणे फेटाळल्या आहेत. सोन्यात अशा प्रकारची भेसळ केली जात असल्याचा दावा खोटा असल्याचं असोसिएशनने म्हटलं आहे.
भेसळ कशी ओळखता येते
असोसिएशनच्या मते, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ चाचणी ही विश्वासार्ह पद्धत आहे. या चाचण्यांमधून सोन्यात कोणतीही भेसळ आहे की नाही, हे स्पष्टपणे समजतं. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी तपासणीच्या या पद्धतींचा आधार घ्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
खरेदी करताना घ्यावयाची काळजी
सोनं खरेदी करताना ग्राहकांनी नेहमी विश्वसनीय विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. हॉलमार्क असलेलं सोनं घ्यावं आणि खरेदीचं पक्कं बिल नक्की घ्यावं, असं असोसिएशनने सांगितलं आहे. पक्क्या बिलामुळे भविष्यात काही अडचण आल्यास ग्राहकाला तक्रार करता येते. अफवांमुळे घाबरून जाण्याऐवजी योग्य तपासणी करूनच सोनं खरेदी करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Leave a Reply