शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कार्तिकी एकादशी: शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहाटे संपन्न झाली. त्यांनी विठूरायाला शेतकऱ्यांसाठी साकडे घातले.

कार्तिकी एकादशी: शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता सपत्नीक संपन्न झाली. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मानाचा वारकरी

यावेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील उंचेगाव येथील सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांना हा मान मिळाला.

शेतकऱ्यांसाठी साकडे

महापूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी विठूरायाला साकडे घातल्याचे सांगितले. यावर्षी राज्यातील शेतकऱ्यावर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. या संकटातून शेतकऱ्याला सावरण्याची ताकद मिळू दे आणि पुढील काळात चांगला पाऊस पडू दे, असे साकडे त्यांनी विठूरायाला घातले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance