रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: मुक्ताईनगरवरून महायुतीत रस्सीखेच

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरच्या जागेवरून महायुतीत तणाव आहे. आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री रक्षा खडसे दोघेही या जागेसाठी आग्रही आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: मुक्ताईनगरवरून महायुतीत रस्सीखेच

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चर्चेत आले आहेत. अर्ज भरण्यापासून ते अर्ज बाद होईपर्यंत आणि आता एक एक जागा निवडून येण्यापर्यंत महायुतीत तणाव दिसत आहे. सहकार क्षेत्रात महायुतीतील असहकाराचीच अधिक चर्चा रंगली आहे. अनेक बडे नेते सध्याच्या राजकीय समीकरणांवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

मुक्ताईनगरचा तिढा, गुलाबराव पाटील मैदानात

मुक्ताईनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. भाजपने त्याग करावा आणि ही जागा शिंदे शिवसेनेला सोडावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. एकाच व्यक्तीकडे किती पदं द्यावीत, असा सवालही त्यांनी वरिष्ठांना केला आहे. त्यांनी रक्षा खडसे यांना टोला हाणला आहे.

मुक्ताईनगरचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतरही पेच कायम असल्याने बड्या नेत्यांसमोरील चिंता वाढली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटलांची समजूत काढण्यात गुलाबराव पाटील यांना यश येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. समजूत काढण्यात यश आल्यास थेट रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील या दोघांचं फोनवरून बोलणं करून देणार, अशी माहिती समोर येत आहे.

प्रतापराव पाटील यांची माघार आणि संयमाचा सल्ला

प्रताप पाटील यांच्या माघारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये रोष होता, पण शेवटी वाटाघाटीमध्ये जे ठरतं ते मान्य करावं लागतं आणि ते त्यांनी मान्य केलं, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. मी त्यांची समजूत काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे. वेळ येईल तेव्हा संधी मिळेल, पण थोडं थांबावं लागणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.

दुसरीकडे सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना आव्हान दिलं आहे. मी दोघांचीही समृद्धी करण्याचा प्रयत्न करेन. आजही मी बोललो आहे की संयम ठेवा. शेवटी आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक हेच एकमेव उद्दिष्ट नाही. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर होऊ नये, यासाठी संयम पाळला पाहिजे, असा सल्ला या दोन्ही नेत्यांना गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

गाव पातळीवर पक्षापेक्षा गावातली भावकी आणि जातीय समीकरणांवर ही निवडणूक होत असते, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन गावाचा विकास करायचा असेल, तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढा. सर्व विचारांच्या लोकांना गावाच्या विकासासाठी एकत्रित घ्या; मात्र हे होत असताना जास्तीत जास्त शिवसेनेचे सरपंच कसे होतील, याकडे लक्ष द्या, अशा सूचना मी दिलेल्या आहेत, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance