गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आजही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून सराफा बाजारात त्यामुळे खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव दोन लाख रुपयांच्या आसपास पोहोचला होता, मात्र त्यानंतर दर खाली येत आहेत. सध्याच्या घसरणीमुळे सोने आपल्या उच्चांकापेक्षा तब्बल ७४ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आजचे सोन्याचे दर
२२ नोव्हेंबर २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ८० रुपये इतका नोंदवला गेला. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ६६० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ९३ हजार ८१० रुपये इतका झाला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याचे सांगितले जात आहे.
भाव आणखी खाली येण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे. दर कमी होऊनही ग्राहकांकडून मात्र खरेदी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. सध्याच्या घसरणीचा अंदाज पाहता सोने एक लाख रुपयांच्या खाली येऊ शकते, अशीही चर्चा आहे.
Leave a Reply