दीर्घकाळ एकाच जागी बसून टीव्ही पाहण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा दावा एका संशोधनाच्या हवाल्याने केला जात आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि ब्रिटनसह अनेक देशांतील शास्त्रज्ञांनी तब्बल १२ वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढल्याचे सांगितले जाते. या संशोधनानुसार अतिप्रमाणात टीव्ही पाहणाऱ्या लोकांच्या किडनीचे कार्य झपाट्याने खालावण्याचा धोका वाढतो. विशेषतः टाइप २ मधुमेह असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असल्याचा दावा केला जातो.
तज्ज्ञांचे मत काय सांगते?
टीव्ही पाहणे हे मनोरंजनाचे साधन असले तरी दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे किडनीवर बेतू शकते, असा दावा केला जात आहे. मात्र या दाव्याची पडताळणी करताना किडनी तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेण्यात आली. तज्ज्ञांच्या मते टीव्ही पाहण्यामुळे थेट किडनीचे नुकसान होते, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पण एकाच जागी बसून राहिल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. हे आजार किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात, त्यामुळे किडनीचा त्रास वाढू शकतो.
टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी?
पडताळणीत जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून टीव्ही पाहिल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो, हा दावा सत्य ठरला आहे. त्यामुळे टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यासाठी वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. दर अर्ध्या ते पाऊण तासाने थोडा ब्रेक घेऊन चालावे, नियमित व्यायाम करावा आणि पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला दिला जातो.
Leave a Reply