गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बिअर पिल्याने किडनीवर होतो परिणाम, संशोधनात धक्कादायक माहिती

बिअर पिल्याने किडनीला इजा होण्याचा धोका अधिक असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले असून यूके बायोबँकच्या २,५०,७९१ जणांवर १४ वर्षे निरीक्षण करण्यात आले आहे.

बिअर पिल्याने किडनीवर होतो परिणाम, संशोधनात धक्कादायक माहिती

बरेच लोक मोठ्या प्रमाणात दारू पितात. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत दारू पिणारेही आहेत. मात्र, बिअर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अनेकांना वाटते की, बिअर प्यायल्याने किडनीला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. मात्र, तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. बिअरच्या सेवनाचा परिणाम फक्त यकृतापुरता मर्यादित नसून तो किडनीवरही होतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

मोठ्या प्रमाणावर केलेले संशोधन

हे संशोधन युनायटेड किंगडममधील अँगलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केले असून ते सायंटिफिक रिपोर्ट्स या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी यूके बायोबँकमधील मद्यपान करणाऱ्या २,५०,७९१ व्यक्तींच्या आरोग्याचा डेटा घेतला आणि त्याचे विश्लेषण केले. या व्यक्तींवर सरासरी १४ वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आले. या काळात १०,३३५ लोकांवर परिणाम दिसून आला.

संशोधनात असे दिसून आले की, जे लोक बिअर आणि व्हिस्की, रम तसेच व्होडका यांचे सेवन करतात, त्यांच्या किडनीला इजा होण्याचा धोका अधिक असतो. बिअर असो वा कोणतीही दारू, धोका कायमच असतो. जे लोक अधिक बिअर पितात, त्यांच्या किडनीवर याचा थेट परिणाम दिसून येतो, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. आपण कायम ऐकतो की, दारू पिल्याने किडन्या निकामी झाल्या. बिअर सतत पिल्याने त्याचा गंभीर परिणाम किडनीवर होत असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले.

किडनीचे काम आणि धोक्याची लक्षणे

किडनी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. किडनीचे काम रक्तातून घाण काढणे आणि जास्त पाण्याला लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून बाहेर टाकणे हे आहे. जास्त पाणी प्यायल्याने लघवी अधिक होते. रिपोर्टनुसार, जास्त बिअर प्यायल्याने शरीर सुजते, जे किडनीसाठी अत्यंत धोकादायक आहे. किडनी अचानक काम करणे बंद करते अशा स्थितीत लघवी कमी होणे, उलटी होणे आणि थकवा येणे अशी लक्षणे दिसून येतात.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance