दुष्काळाच्या झळांमध्ये पशूधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी जिकरीचे काम झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांचा विमा शेतकऱ्यांना मोठा आधार देतो. पशुधन विमा योजनेअंतर्गत जनावराचा विमा उतरवलेला असल्यास, त्याच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मिळवता येते.
गंभीर आजाराने, अपघातात, विषबाधेमुळे अथवा नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावले तर विम्याची रक्कम कशी मिळेल, याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे क्लेम करण्याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.
कोणत्या परिस्थितीत विमा रक्कम मिळते?
गंभीर आजार, अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक आपत्ती यांमुळे जनावर दगावल्यास विमा संरक्षण लागू होते. अशा वेळी विमा कंपनीकडे क्लेम सादर करून विम्याची रक्कम मिळवता येते.
क्लेम कसा करावा?
जनावर दगावल्यानंतर विमा कंपनीला वेळेत माहिती देणे आणि क्लेम सादर करणे गरजेचे असते. प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास विमा रक्कम मिळण्यास अडचण येत नाही.
Leave a Reply