दुपारचे जेवण झाल्यानंतर डोळ्यांवर झोप येणे, शरीर जड वाटणे आणि कामात लक्ष न लागणे, असा अनुभव अनेकांना येतो. विशेषतः कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना जेवणानंतर आळस आणि थकवा जाणवतो. मात्र, यामागे केवळ पोट भरून जेवणे हेच कारण नसते.
पोस्टप्रॅन्डियल सोम्नोलन्स म्हणजे काय?
दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याच्या या स्थितीला वैद्यकीय भाषेत पोस्टप्रॅन्डियल सोम्नोलन्स असे म्हणतात. ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी काही लोकांमध्ये तिचा परिणाम अधिक जाणवतो. शरीरातील नैसर्गिक बदलांपासून ते चुकीच्या आहाराच्या सवयींपर्यंत अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
आहाराच्या सवयींकडे लक्ष द्या
जेवणानंतर येणाऱ्या झोपेमागे आहाराच्या सवयींचाही मोठा वाटा असतो. त्यामुळे जेवणात काय खातो, किती खातो आणि कसे खातो, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दैनंदिन सवयींमध्ये योग्य बदल केल्यास जेवणानंतरचा आळस कमी होण्यास मदत होऊ शकते.
Leave a Reply