उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘मी पायाने गाठ मारली तर ती हातानेही सुटणार नाही’ असे विधान केले आहे. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत सामंत यांनी हा इशारा दिला आहे.
इशारा नेमका कुणाकडे?
सामंत यांचा हा इशारा नेमका कुणाकडे आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे की भाजपकडे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांच्या या विधानाने राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्ता मेळाव्यातील विधान
कार्यकर्ता मेळाव्यात दादागिरीला प्रत्युत्तर देताना सामंत यांनी आपण हतबल नसल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी आपण मागे हटणार नसल्याचा संदेश त्यांनी या विधानातून दिला आहे.
Leave a Reply