राज्यात कार्यरत असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसह अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे.
महागाई भत्ता ६० वरून ६३ टक्क्यांवर
या वाढीमुळे आता संबंधित अधिकाऱ्यांना ६० टक्क्यांऐवजी ६३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारनेही अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलैपासूनची थकबाकी रोख स्वरूपात
वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. जुलैपासूनची थकबाकीही संबंधित अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना या निर्णयाचा थेट आर्थिक लाभ होणार आहे.
Leave a Reply