बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठाणे पोलीस आयुक्तांसह मंत्री सामंतांचे अकाऊंट हॅक

ठाणे पोलीस आयुक्त डुंबरे यांचे व्हॉट्सॲप हॅक होऊन आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित झाले. मंत्री उदय सामंत यांचेही मोबाईल व सोशल अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तांसह मंत्री सामंतांचे अकाऊंट हॅक

ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांचेही मोबाईल आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. सायबर गुन्हेगार आता पोलिस आणि मंत्र्यांची खाती हॅक करण्यापर्यंत पोहोचले आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह व्हिडीओ

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक करून त्यांच्या व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सायंकाळी 4.46 वाजताच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसू लागले. अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या खात्यावरून सुमारे 15 ते 20 आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स स्टेटसवर प्रसारित करण्यात आल्या. त्यानंतर पोलीस खात्यात खळबळ उडाली. हा प्रकार इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. सुमारे 50 मिनिटे ते एक तास आक्षेपार्ह व्हिडीओ त्यांच्या स्टेटसवर होते आणि सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद करून सर्व व्हिडीओ डिलीट करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मंत्री उदय सामंत यांनाही हॅकिंगचा अनुभव

ठाणे पोलिसांचा मोबाईल हॅक झाल्याच्या संदर्भात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपलाही मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. वाढते तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले सायबर हॅकर्स यामुळे अशा घटना घडत असाव्यात, असे ते म्हणाले. पोलीससुद्धा माणूसच आहेत, त्यांच्याकडे कोणतीही वेगळी शक्ती नाही, त्यामुळे त्यांचाही मोबाईल हॅक झाला असावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सायबर हॅकर्सच्या माध्यमातून आपल्याला कोणालातरी 3 हजार 500 रुपये द्यावे लागल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance